पुणे : पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती पै. मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभाग छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. मंगलदास बांदल यांच्या घरी मंगळवारी पहाटेपासून ही कारवाई सुरु असून तब्बल ६ तास ही कारवाई सुरु होती.
मंगलदास बांदल यांच्या हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर ईडीने धाड टाकली आहे. बांदल कुटुंबातील सर्व सदस्य घरातच माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. मंगलदास बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत. तर हडपसर येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल आणि सोबत पुतणे आहेत.
दरम्यान, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकी आधीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांच्या ‘या’ नेत्याने दिला डच्चू; ‘घड्याळा’ऐवजी हाती घेणार ‘मशाल’
-पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाची अपडेट; रक्ताचे नमुने बदल्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक
-मराठा आरक्षणाबाबतच्या संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी काढली लायकी, नेमकं काय झालं?
-ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीत राडा; जगदीश मुळीकांनी काढली अजित पवारांच्या आमदाराची पात्रता
-पुण्यात ट्रॉफिक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन; वाहन चालकांकडून ओवाळणी म्हणून घेतलं ‘हे’ महत्वाचं वचन