पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो बाबत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे. रोहित पवारांवर केलेल्या या करावाईने रोहित पवारांसह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.
रोहित पवार, बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. शिखर घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कारखान्यातील १६१.३० एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर
-लोकसभा निवडणुकीसाठी ‘धकधक गर्ल’ माधुरीला भाजपची ऑफर??; म्हणाली, ‘मी…’
-‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती
-‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया