पुणे : पुणे शहरात वाढत्या शहरीकरणामुळे, वाढत्या वाहतूकी कोंडी आणि वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील वाघोली केसनंद परिसरामध्ये काल (रविवारी) रात्री उशीरा १२ ते १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या ९ जणांना डंपरने चिरडलं आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्याने डंपरच्या भरधाव वेगाने रस्त्याच्या बाजूला फूटपाथवर झोपलेल्या तब्बल ९ जणांच्या अंगावर डंपर घातला. यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी आहेत.
विशाल विनोद पवार वय २२ वर्ष, वैभवी रितेश पवार वय १ वर्ष, वैभव रितेश पवार वय २ वर्ष ( सर्व रा. अमरावती मूळ जिल्हा) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. ‘आम्ही सगळे अमरावतीचे आहोत. अमरावतीवरून या ठिकाणी विविध कामांसाठी आलो होतो. मात्र काल रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली, आणि आमच्या कुटुंबातले तीन जण यात गेले. आमची हीच अपेक्षा आहेत की आता आम्हाला घरादराची व्यवस्था करावी. आमच्या गावी कोणतीही सोय नसल्यामुळे आम्हाला काम कामासाठी पुण्यात यावं लागतं मात्र, राहायची सोय नसल्यामुळे अशा पद्धतीने फुटपाथवर देखील झोपायला लागतं. अपघातात माझा पुतण्या आणि दोन लहान मुलांचे निष्पाप बळी गेल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.
“ही अतिशय गंभीर घटना आहे. डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. तो अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत आहे की नाही हे तपासण्यासाठी मेडिकल टेस्ट सुरु आहे. ड्रायव्हर २६ वर्षाचा आहे. हलगर्जीपणा दिसला तर कारवाई करण्यात येणार आहे. निवारा मिळाला नाही म्हणून ते फूटपाथवर झोपले. यात कामगारांची चूक नाही. कारण अपघात फुटपाथवर झाला आहे. डंपरवर काही प्रमाणात बंधन आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती अमरावतीचे आहेत. कामासाठी पुण्यात आले होते”, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘यॉर्कर टाका, गुगली टाका, मी पण बॅट्समन’
-Pune: अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना नाव बदलासाठी धमकीचे फोन
-महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? संजय राऊत म्हणाले, ‘मुंबईत लढावंच लागेल पण…’
-पुणेकरांनो सावधान! सिग्नल मोडणं पडतंय महागात; ११ महिन्यात ४२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
-क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत पुण्यानं पटकावलं पाचवा क्रमांक; कशात केली सर्वाधिक गुंतवणूक?