पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेल द लिक्विड लिझर लाऊंजमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणाने डोकं वर काढलं असून शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरुन पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणी भाष्य केले आहे.
‘गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांना जाग येऊन त्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे’, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 24, 2024
‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजप-शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Drugs Party: पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी मेधा कुलकर्णींनी पोलिसांना दिले ‘हे’ आदेश
-शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र म्हणाले, “निवडणूक यादीतून ‘पिपाणी’ हटवा अन्यथा…”
-Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज