पुणे : सध्याच्या काळात मोबाईल, टॅब आणि कम्प्युटर पाहणाऱ्यांची संख्या अतिशय वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईचा वापर अतिप्रमाणात करताना दिसतात. कोरोना काळातही अनेकांचे जॉब वर्क फ्रॉम होम असल्याने तसेच होम क्वारंटाईन असल्यामुळे अनेकांचा मोबाईल पाहण्याची सवय वाढली. आजच्या डिजिटल युगात अगदी अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामानिमित्त प्रत्येकाला मोबाइलची गरज पडते. त्यामुळे स्क्रीनकडे दीर्घकाळ टक लावून पाहणे आता अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. पण, यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या किंवा इतर अनेक समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे.
डोळ्यांच्या कोरडेपणाच्या या समस्येला ‘ड्राय आय सिंड्रोम’, असे म्हणतात. या समस्येमुळे अनेकांना अस्वस्थता, जळजळ आणि दृष्टिदोषाचा त्रास होऊ लागतो. या समस्येवर इन्स्टाग्रामवर कंटेन्ट क्रिएटर ॲलन मँडेल याने एक उपाय सुचविला आहे. हा उपाय म्हणजे तुम्हाला फक्त ‘एका मिनिटासाठी तुमचे डोळे मिचकवायचे आहेत.’ जेव्हा आपण स्क्रीनकडे बराच वेळ एकटक पाहतो, तेव्हा डोळे कमी लुकलुकतात. ज्यामुळे डोळे कोरडे होतात, डोळ्यांची जळजळ होते, असे त्यांनी सांगितले आहे.
आपल्या डोळ्यांच्या कोरडेपणापासून सुटका हवी असेल तर आपण हा व्यायाम नियमित करावा. काही सेकंदांसाठी हळुवारपणे डोळे बंद करा. नंतर डोळे उघडा आणि फक्त डोळे मिचकावणे सुरू करा. तुमच्या डोळ्यात थोडे पाणी येईल आणि त्यामुळे दिवस चांगला होण्यास मदत होईल, असे कंटेन्ट क्रिएटर ॲलन मँडेलचे म्हणणे आहे.
ॲलन मँडेलच्या म्हणण्यानुसार डोळे मिचकवण्याचा व्यायाम फायदेशीर असला तरीही डॉक्टरांचे म्हणणे. ज्यांच्या डोळ्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे किंवा ज्यांचे डोळे दीर्घकाळ कोरडे राहतात अशा व्यक्तींनी व्यायामावर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. अशात कृत्रिम अश्रू, प्रिस्क्राइब्ज्ड आय ड्रॉप्स किंवा इतर काही गोष्टी आवश्यक असू शकतात. या समस्येवर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या-