पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवरील एल ३ लाऊज पबमध्ये प्रकरणामध्ये २ तरुणांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्या तरुणांची ओळख पटली असून या दोन्ही तरुणांची ओळख अशाच पार्ट्यांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील एक तरूण मुंबईतील गोरेगावमधील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढवा भागातील आहे. दोन्ही तरूण हे उच्चशिक्षित असून एक आर्किटेक्ट आहे तर दुसरा सॉफ्टेवअर इंजिनिअर आहे. मुंबईत राहणारा तरूण हा आर्किटेक्ट आहे आणि तो मेफेड्रॉन घेऊन पुण्यात आला होता. तर दुसरा तरूण हा पुण्यातील मुंढव्यातील असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
व्हिडीओमधील दोघे तरुण शनिवारी संध्याकाळी एकत्र आले आणि रात्री एल ३ या पबमध्ये गेले. यातील एका तरूणाला मुंबईतून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे पाच ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. हे मेफेड्रॉन त्यानं मुंबईतून खरेदी केले होते. त्यामुळे पुण्यासोबतच मुंबईमध्येही मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलिसांकडूनही केला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला जामीन तर मृतांच्या पालकांना १० लाख रुपयांची मदत
-व्हायरल व्हिडीओनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; एफसी रोडवरील ‘त्या’ बारचे लायसन्स रद्द
-चहा, कॉफीचे शौकीन आहात? तुम्हाला चहा, कॉफी पिल्याने होणारे ‘हे’ तोटे माहिती आहेत का?
-Pune Hit & Run: पोर्शे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
-पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन धंगेकरांची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘पोलिसांवर कारवाई म्हणजे..’