पुणे : सर्वसामान्यासाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता सर्वच प्रकारच्या औषधांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांना त्याची मोठी आर्थिक झळ बसत आहे. वाढत्या महागाईत औषधाचा खर्च परवेडानासा झाला आहे. अनेक औषधांच्या किंमती दुप्पटीहून अधिक वाढल्या आहेत.
फार्मा कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना मोठा निधी दिला आहे. त्यानंतर हा खर्च रुग्णांच्या खिशातून तर वसूल केला जातोय का? असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने हे आरोप फेटाळले आहे.
कोरोना रोगाची साथ आणि चीनकडून कच्चा मालाच्या होणाऱ्या किंमतीत वाढ झाल्याने औषध कंपन्यांनी वाढलेल्या किंमतीचे कारण सांगितले आहे. मात्र, निवडणूक रोख्यांचाच हा परिणाम असल्याचा आरोप आता सर्व स्तरातून केला जात आहे. प्रामुख्याने गेल्या वर्षभरात औषधांच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाल्याबद्दल वैद्यकीय कार्यकर्ते गंभीर चिंता व्यक्त करत आहे. औषध किंमतीमध्ये सरासरी ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘एका ठोक्यात २ तुकडे करण्याची माझ्यात धमक’; अजित पवारांचं वक्तव्य
-सुनेत्रा पवारांच्या सोबतीला सर्जा-राजाची जोडी! बैलगाडीतून मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून स्वागत
-‘आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ द्या, उद्याच मंत्री करतो’; अजित पवारांचं वक्तव्य
-‘महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होतेय, आपणही मतदान करून सामील व्हावे’; सुनेत्रा पवारांचे आवाहन
-मावळमध्ये संजोग वाघेरेंना शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरेंची एन्ट्री!