पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग्ज पकड्यासाठी विशेष १० पथकं तयार केली आहेत. त्यावरुन पुणे पोलिसांच्या या पथकाकडून विविध भागात ड्रग्ज जप्त केले जात आहे. पुणे पोलिसांकडून दिल्ली आणि पुण्यातील ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन ड्रग्ज साठा आला असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे पथक सकाळपासून कुपवाड शहरात ठाण मांडून आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस आणि पुणे पोलिसांच्या पथकाकडून कुपवाड परिसरातील स्वामी मळा, बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या भागांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांकडून चौकशीच्या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे. कुपवाडमधील काही ठिकाणी ड्रग्जशी संबंधित साठा देखील सापडल्याची माहिती समोर आली आहे. नार्कोटेक्स विभागाच्या पथकाकडून सापडलेल्या साठ्याचा पंचनामा करण्यात येत आहे. तपासणीनंतर स्पष्टता होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये ३ नावांची चर्चा; धंगेकरांना उमेदवारी देण्याची समर्थंकांची इच्छा
-अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांसोबत; रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही…’
-मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिल्यानंतर भाजपचा आणखीन एक सर्व्हे; कोणाचं नावं आघाडीवर?
-पुणे पोलीस सॅम ब्राऊनच्या शोधात; ३ महिन्यात २ हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट
-“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”