Benefits of Drinking Water : आता उन्हाळा संपला अन् पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अशा दिवसात नळाला पिण्याचे पाणी गडूळ (पाण्यात कचरा, माती) येणे ही समस्या सामान्य असते. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याद्वारे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक पाणी उकळून थंड केलेले किंवा मग गरम पाणी पितात. गरम पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर याचे खूप फायदेशीर परिणाम होत असतात. गरम पाणी हे कितपत योग्य आहे? तसेच दिवसभर गरम पाणी पिण्याने शरीरावर त्याचे काय परीणाम होतात याबाबत आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
गरम पाणी पिण्याचे फायदे :-
अनेकांना बद्धकोष्ठता, ॲसिडिटी सारख्या तक्रारी असतात. या सामान्य आहेत. मात्र, अशावेळी गरम पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते, यामुळे पोटातील घाण निघून जाते, आणि तुमचा ताजेपणा दिवसभर टिकून ठेवते.
गरम पाणी पिण्याने शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास फायदा होतो. तसेच आपल्याला सर्दी-कफ झाला असेल तर गरम पाणी प्यायल्याने बराच आराम मिळतो.
वाढत्या वयात त्वचेशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात, अशीच एक समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे. पण नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने त्वचेतील पेशी उत्तेजित राहतात आणि त्या सुरकुतण्याची क्रिया काहीशी मंदावते. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यास त्वचा मऊ तर दिसतेच पण तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीही गररम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यासही चांगला फायदा होतो. सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला सर्दी किंवा घशाशी संबंधी काही अॅलर्जी झाली असेल, तर गरम पाण्याने ती दूर होते. गरम प्यायल्याने वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपण लांब राहतो. सायनसमध्ये सुधारणा होते आणि श्वसनक्रिया सुरळीत होण्यास याचा फायदा होतो.
दिवसभर गरम पाणी पिण्याचे तोटे :-
पाणी खूप जास्त गरम असेल तर जीभेला त्याचा त्रास होऊ शकतो. जीभ भाजली गेली कर आपली चवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो जास्त गरम पाणी पिणे टाळले पाहिजे, पाणी गरम करून थंड करून पिले पाहिजे.
शरीराच्या आत असणाऱ्या अन्ननलिका, पोट यांच्यासाठीही खूप गरम पाणी चांगले नाही. त्यामुळे या अवयवांना काही त्रास होण्याची शक्यता असते.
एकदम झोपायच्या आधी गरम पाणी प्यायल्याने आपली झोपेची सायकल बिघडू शकते. त्यामुळे झोपताना जास्त गरम पिणे टाळले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
-साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार
-वाहन चालकाकडून पैसे घ्याल तर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा
-स्मार्ट सिटी म्हणून गाजावाज केला त्याचं काय?; पुण्याच्या परिस्थितीवरुन सुप्रिया सुळे सरकारवर आक्रमक
-‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव