पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरा जवळील ओंकारेश्वर पुलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अंतिम युक्तिवादास सुरुवात करण्यात आली आहे.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी अंतिम युक्तिवादास सुरुवात केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अनिष्ठ प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत होते. आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण केली. आरोपींविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. आरोपींवर दाखल केलेला गुन्हा सिद्ध होतो. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले आहे, अशी माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली आहे.
या खटल्याची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सरकारी वकील ॲड. सूर्यवंशी बचाव पक्षाच्या युक्तिवादावर आपले म्हणणे मांडणार आहेत. सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवादास सुरुवात करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन
-पुण्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन; दीपक मानकरांनी गायला पोवाडा
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले…
-सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करुन नाही म्हणून तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून