पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा ससून रुग्णालयामधील अनेक प्रकरणं समोर येत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये गरिब रुग्णांवर उपचार केले जातात. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरांनी बाहेरुन औषधे आणण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. एकनाथ पवार यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना तंबी दिली आहे.
ससून रुग्णालयात येणारे रुग्ण हे प्रामुख्याने गरीब असतात. अशा रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये. रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत, अशी तंबी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी शुक्रवारी दिली.
डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर महाविद्यालय परिषदेची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीमध्ये औषधे खरेदी आणि रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास लावण्याच्या मुद्द्यावर झाली.
महत्वाच्या बातम्या-
-‘हे सरकार जातीयवादी, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु केला’; नाना पटोलेंची सरकावर आगपाखड
-पोलीस भरती मैदानी चाचणीबाबत फडणवीस म्हणाले, ‘पावसामुळे तर मैदानी चाचण्या पुढे पण…’
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना
-‘मी बारामतीची जबाबदारी दुसऱ्यांवर दिली होती, पण…’; शरद पवारांचा अजितदादांना अप्रत्यक्ष टोला
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट