पुणे : पुणे शहरामध्ये वाढते ड्रग्ज प्रकरणावरुन शहरातून संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम दिला आहे. ‘आमची दादागिरी काय असते ते तुम्हाला दाखवू असा इशारा अवैध व्यावसाय करणाऱ्यांना दिला आहे. गेल्या काही दिवसात ड्रग्ज प्रकरण, अनाधिकृत पब, अवैध धंदे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमारांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरी संवादाचे आयोजन पुण्यात केले होते. समाजिक सलोखा वाढती बाल गुन्हेगारी वाढती व्यसनाधिनता आणि कायदा सुव्यवस्थेबाबत आयुक्तांनी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये बोलताना अमितेश कुमार यांनी अवैध धंदा करणाऱ्यांना सज्जड दम दिला आहे.
मारहाण करणे, त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पुणे पोलिसांचा संयम तुटला तर कडक कारवाई करण्यात येईल. येरवड्यात आंतर्धमीय विवाहवरून झालेला खून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार बोलत होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; सुरक्षा जवानांना ‘सॅल्यूट’ला नकार
-‘…म्हणजे विधानसभेसाठी शरद पवारांकडे उमेदवार नाहीत’; अजित पवार गटाची टीका
-लोकसभेला पाठिंबा विधानसभेला ‘एकला चलो रे!’ पुण्यात मनसेची स्वबळाची चाचपणी; सर्व्हेही सुरू
-शिंदे-फडणवीस सरकारचं शेवटचं अधिवेशन फडणवीसांना पडणार भारी; पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गट घेरणार