पुणे : पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता उद्दिष्टे पूर्ततेच्या अनुषंगाने महापालिकेकडून थकबाकी वसुली, मिळकत जप्तीची व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती उपायुक्त आणि कर आकारणी व कर संकलनप्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे.
पुणे महानगरपलिका कार्यक्षेत्रातील ज्या मिळकत धारकांनी अद्यापही मिळकत कर भरलेला नाही, अशा थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव मोहीम २२ तारखेपासून सुरु करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रात परिमंडळ निहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत. नागरिकांना मिळकत कर भरणे सुलभ व्हावे याकरिता सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी व प्रत्येक शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत व रविवार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत, असे माधव जाधव म्हणाले आहेत.
पुणे महापालिकेकडून नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation.org” या संकेतस्थळावरून मिळकत कर भरण्याबाबत आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अजितदादा भाजपसोबत गेले म्हणून त्यांची व्होट बँक कमी झाली”
-पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीतही; आतापर्यंत २ हजार किलो ड्रग्ज जप्त
-पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन!; पुणे पोलिसांकडून कसून चौकशी
-लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये ३ नावांची चर्चा; धंगेकरांना उमेदवारी देण्याची समर्थंकांची इच्छा
-अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांसोबत; रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही…’