पुणे : पुण्यातील दांडेकर पुलाजवळील ‘राष्ट्र सेवा दल’ येथील हॉलमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ‘निर्भय बनो’ सभा घेतली. या कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या सभेत बोलताना निखिल वागळे यांनी अजित पवारांचा ‘दादा’ असा उल्लेख केला. त्यावर सभेतील श्रोते म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार म्हणा, दादा म्हणू नका’ असं सांगितले.
‘आता फक्त रोहित पवारच दादा’ असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यावर रोहित दादा पण धाडसी आहेत. मला ७ वेळा जेलमध्ये गेलो २ वेळा विधानसभेने पाठवलं. जेल ही वाईट जागा नाही’, असंही निखिल वागळे रोहित पवारांना म्हणाले.
ज्याचे हात स्वच्छ तो तुरुंगात जायला घाबरत नाही. तुरुंग ही आत्मपरिक्षणाची जागा आहे. शरद पवारांच्या सरकारने एकदा तरुंगात टाकलं असल्याचंही यावेळी निखिल वागळे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरे ‘इतिहास संशोधक मंडळा’त पोहचले अन् दिली ‘ही’ मोठी देणगी
-पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
-“देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं”
-“तुझ्या बापाने पाहिला का माझ्याबरोबर काँन्ट्रॅक्टर”; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर अजितदादा भडकले
-निखिल वागळेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाई; धीरज घाटेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल