Important Settings : आताच्या बदलत्या काळात लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांकडून मोबाईल फोन वापरला जात आहे. अलिकडील लहान मुलांना तर मोबाईलशिवाय कोणतेच काम करत नाहीत. मात्र सध्या इतर विषयांपेक्षाही अडल्ट कॉन्टेन्ट म्हणजेच लहान मुलांनी पाहू नये असा चुकीचा कॉन्टेन्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. आता लहान मुले अशा कॉन्टेन्टपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना मोबाईलपासून लांब ठेवणे दरवेळी शक्य होत नाही. म्हणून मग मोबाईलमध्ये अशा काही सेटिंग्ज करा की, जेणेकरुन हा कॉन्टेन्ट लहान मुले पाहणार नाहीत….
You tube Content
आपली लहान मुले जर यु-ट्युबवर रिल्स किंवा शॉर्टस् व्हिडिओ बघत असतील आणि अडल्ट कॉन्टेन्ट मुलांसमोर येऊ नये यासाठी यु-ट्युबमध्ये देखील उत्तम सेटिंग्ज आहेत. ज्यामुळे आपल्या मुलांच्या समोर असा कॉन्टेन्ट येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ‘Youtube’ वरती जायचे आहे. ‘सेटिंग’मध्ये क्लिक करायचे आहे. सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्ही ‘जनरल’ वरती क्लिक करायचे आहे. आता Youtubeवर दिसणारे अडल्ट व्हिडिओ तुमच्या लहान मुलांना दिसणार नाहीत.
गुगल प्ले स्टोअर ‘सेटिंग’
सर्वात आधी आपल्या गुगल प्ले स्टोअर जायचे आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तिकडे तुम्हाला सेटिंगमध्ये जायचे आहे. सेटिंगमध्ये केल्यानंतर ‘जनरल’ म्हणून एक ऑप्शन दिसेल, तिकडे क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली आल्यावर ‘फॅमिली’ म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक पिन कोड सेट करायचा पिनकोड सेट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की, ३ वर्ष, ५ वर्ष, १८ वर्ष वयोमानानुसार तुम्हाला सेट करायचे आहे. जेणेकरून ज्या-त्या वयात पाहिला जावा तेवढेच कॉन्टॅक्ट त्या मुलांच्या समोर येईल. तसेच लहान मुलांनी पाहिला जाऊ नये असा कॉन्टेन्ट त्यांच्या समोर येणार नाही, तसेच अशा पद्धतीने प्ले स्टोर वरून चुकीचा किंवा अडल्ट कॉन्टेन्ट डाउनलोड होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
Instagram ‘सेटिंग’
आता सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे Instagram. यावरील अडल्ट व्हिडिओ लहान मुलांना दिसू नये म्हणून Instagram अॅपमध्येही महत्वाचे सेटिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Instagram वरती जायचे. ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ वरती क्लिक करायचे. यानंतर ‘सजेशन कॉन्टॅक्ट’मध्ये क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला ‘सेन्सिटिव्ह कॉन्टॅक्ट’ असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर थेट ‘लेस’ या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. ज्यामुळे आपल्या मुलांच्या हातात मोबाईल असताना त्यांना Instagramवरील चुकीचा कॉन्टेन्ट दिसणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-महिलांसाठी महत्वाची बातमी; दरवर्षी करा ‘या’ ६ मेडिकल टेस्ट नक्कीच करा, टळू शकतो गंभीर आजारांचा धोका
-पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर; चर्चेला उधाण
-Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे
-पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप
-अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?