Health Update : आयुर्वेदामध्ये सांगितलेली पाणी पिण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे का? आजकाल लोकांना बॉटलमधील पाणी पिण्याची सवय जास्त लागत आहे. त्यामुळे जास्त तर लोक उभं राहून पाणी पिताना दिसतात. असे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आपण उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये, यामुळे आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि पोटाच्या समस्याही वाढू शकतात, असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. आता आपण उभं राहून किंवा झोपून पाणी पिल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया…
उभे राहून पाणी पिल्याने काय होते?
जर तुम्ही चालता चालता तसेच उभे राहून पाणी पीत असाल तर आजच ही सवय बदला. कारण या स्थितीमध्ये पाणी पिल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.
काहींना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो.
फुफ्फुसात देखील समस्या जाणवू शकतात. पचनक्रियेत अडथळा येऊ शकतात. पनसासंबंधीच्या समस्या होऊ शकतात.
मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये.
उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांचा त्रास होऊ शकतो. ही सवय दीर्घकाळ राहिल्यास तुम्हाला गुडघेदुखी होऊ शकते. हे देखील उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम आहेत.
उभे राहून किंवा झोपून पाणी पिल्याने आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. सांधेदुखीसारखे वेदनादायक आजारही होऊ शकतात.
जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पाणी शरीराच्या खालच्या भागात लवकर पोहोचते आणि पचनक्रिया बिघडू लागते. म्हणून उभे राहून कधीही पाणी पिऊ नये आणि बसून पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
उभे राहून पाणी पिल्याने स्थितीत पाणी प्यायल्याने शरीर ताणतणावाखाली राहते आणि त्यातील द्रव संतुलनही बिघडते.
पाणी आरामात पिणे नेहमीच उत्तम आहे. यामुळे शरिरातील सर्व महत्वाच्या अवयवांपर्यंत पाणी पोहोचते आणि आपले शारिरीक कार्य योग्य प्रकारे करु शकते.
पाणी पिण्याची योग्य पद्धत प्रत्येकाने ग्लासमध्ये घेऊन हळू हळू प्यावे. योग्य मार्ग म्हणजे सिप करून पाणी प्यायले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स
-बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू
-Baramati | अजितदादांचं बॅक टू वर्क सुरु; सकाळी केली विकास कामांची पाहणी
-Pune News : धक्कादायक! पुण्यात गॅस चोरी करताना झाला मोठा स्फोट अन्…
-‘शाहरुख अन् करणचे ‘तसले‘ संबंध’; दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट