White Hairs : अलिकडच्या काळात अनेकांचे केस कमी वयातच पांढरे होताना दिसतात. पण असं का होतं, अनेकदा बाजारात आलेल्या नव्या शॅम्पो, मेहंदी किंवा अन्य केमिकल युक्त प्रोडक्ट केसांसाठी वापरले जातात. मात्र, डॉक्टरांच्या मते, किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा केस पांढरे होण्याची समस्या दिसते, यावर संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की, पांढरे केस होण्याच्या समस्येला कॅनेटी असे म्हणतात. जर केस कमी वयात पांढरे झाले तर त्याला (प्री मॅच्युर कॅनिटी)असे म्हणतात. ज्यांचे केस काळे किंवा तपकिरी आहेत, त्यांच्यात हा बदल लवकर दिसून येतो. मेलनिन हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो मानव व प्राण्यांमध्ये त्वचा, केस व डोळ्यांचा रंग ठरवतो. कमी मेलनिन तयार झाल्यामुळे देखील केस पांढरे होतात.
कमी वयात केस पांढरे होण्याची प्रमुख कारणे
आनुवंशिकता: अनुवंशिकमुळे देखील काही तरुण-तरुणींचे केस लवकर पांढरे होतात. तुमच्या आई अथवा वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस लवकर पांढरे होतात.
तणाव: अतिविचार, ताण किंवा मानसिक दबावामुळे देखील केसांचे नैसर्गिक रंग जाऊन केस लवकर पांढरे होऊ शकतात. त्यामुळे अतिविचार, कोणताही मानसिक ताण घेऊ नये.
पोषण आहार: पोषण कमी असलेले आहार, विशेषतः व्हिटॅमिन B12, फॉलिक असिड,व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी यांची कमतरता असल्यास केसांवर परिणाम होतो. त्यामुळे पोषक तत्वे समाविष्ट असलेले अन्न आपल्या दैनंदिन आहारामध्ये असावेत.
आरोग्याचे मुद्दे: कमी वयात थायरॉईड, कॅन्सर तसेच एचआयव्ही पॉझिटिव्ह सारख्या गंभीर आजारांमुळे देखील केस पांढरे होऊ शकतात. तुम्ही इतर कुठले औषधे घेत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या केसांवर परिणाम होऊ शकतो.
धूम्रपान: धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन किंवा अल्काहोलचे अतिसेवन झाल्यामुळे देखील कमी वयात केस पांढरे होऊ शकतात. त्यामुळे धूम्रपान करु नये.