पुणे : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा महायुतीमध्ये अद्यापही सुरु आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. महायुतीत भाजपसोबत असणारे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानेकारक जागा देणं भाजपला मोठं आव्हान आहे. एकीकडे अजित पवार जागा वाटपाटच्या चर्चेत व्यस्त आहेत तर दुसरीकडे अजित पवारांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्षासह १३७ जणांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त केली. या सर्व नाराज जिल्ह्यातील प्रमख पदाधिकाऱ्यांची नाराजी अजित पवारांनी दूर करण्याचा प्रयत्न केली मात्र तरीही त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत राजीनामा दिला आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं असलं तरी पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत. हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात ‘वेळ पण तीच, मालक पण तोच’ ही नवीन टॅग लाईन देत पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांसह १३७ जण एकाच वेळी शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. लोणावळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वकियांना चिंता की विरोधकांना धास्ती! मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका लावला कोणी?
-‘भाजप भ्रष्ट जुमला पक्ष, निवडणूक जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील’; सुप्रिया सुळेंची जहरी टीका
-‘ज्या २२ आमदारांचा उल्लेख केला त्यातली २ तरी जाहीर करा’; सुनिल शेळकेंचे रोहित पवारांना आव्हान
-महापालिका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल; कारवाई होण्याआधीच रोख रकमेसह फरार
-बारामतीतून लढण्यावरून सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “उमेदवार म्हणून माझंच नाव…”