पुणे : पुणे पोलिसांनी शहरात धडक कारवाया करत अनेक भागातून ड्रग्ज जप्त केला आहे. २ दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४४ किलो ७९० ग्रॅम किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. २ पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे तब्बल ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोन सापडले. यावरुन त्यांच्यावर कारवाई करत पोलीस दलातील २ पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ तर एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
तब्बल ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोन अमली पदार्थ एका पोलीस उपनिरीक्षकाकडे सापडले आहे. या गंभीर गुन्ह्यात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके या पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आले. विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. पिंपळे निलख रक्षक चौकात हॉटेल कामगाराकडून दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केल्यानंतर या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक करण्यात आली आहे. विकास शेळके याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. विकास शेळके याचा या प्रकरणात हात असल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“राष्ट्रवादीत फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
-“अमोल कोल्हे फिल्मी डायलॉगबाजी करणारे खासदार! धाकल्या धन्याचं नाव घेवून पैसे कमावतात”
-‘या निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात येणार’; रोहित पवारांचा विश्वास
-आढळराव राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत; अजित पवारांनी टाळला नामोल्लेख
-“ज्यांच्या नाकाखालून सहकारी निघून गेले त्यांची बरोबरी मोदी, शहांसोबत काय करणार?”