पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. आज पुण्यातील शरद पवारांचे निवासस्थान ‘मोदी बागे’त बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही उपस्थित असणार आहेत. उद्या राज्यसभेच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याचा शेटवचा दिवस आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेला पुर्णविराम देण्यासाठी शरद पवार हे त्यांच्या गटातील खासदार, आमदारांची मत जाणून घेणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, राजेश टोपे हे देखील उपस्थित आहेत.
‘सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय स्थित्यंतर सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात वेगानं घडामोडी घडत आहेत याविषयी चर्चा सुरु आहेत. उमेदवारी चाचपणी आणि पक्षाची नीती ठरवण्याचं काम सुरु आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. पण चर्चा सुरु आहे, याबाबत आपल्याला लवकरच कळेल’, असं मंगलदास बांदल माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-२०१९ला विधानसभेत मेधा कुलकर्णींना नाकारलं आता जाणार थेट राज्यसभेत??
-डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनवणी लवकरच होणार; सीबीआयचा युक्तीवाद संपला
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी फरार; दोन पोलीसांचे निलंबन
-पुण्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन; दीपक मानकरांनी गायला पोवाडा
-राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैद धंद्यांवर करडी नजर; गावठी दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त