पुणे : लोकसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. आपापल्या पक्षाकडून पक्षांतील योग्य उमेदवार निवड सुरु आहे. काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभेसाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, यावरून काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे.
काँग्रेसमधील एक गट पुणे शहरातून उमेदवारीसाठी ‘ओबीसी’ चेहरा असावा अशी मागणी करत आहे, तर दुसऱ्या गटाकडून ‘मराठा’ उमेदवारासाठी दिल्लीत ‘फिल्डिंग’ लावली असल्याची चर्चा आहे. पुणे लोकसभेला मराठा की इतर मागासवर्गीय (ओबीसी) यापैकी कोण उमेदवार असावा, यावरून काँग्रेसमध्ये तर्कवितर्क सुरू आहे.
काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या स्पर्धेत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही मिळत आहे. रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, त्यांची काँग्रेसमधील लोकप्रियतताही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी समर्थकांची मागणी आहे.
येत्या शनिवारी काँग्रेस भवनाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेत कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांसोबत; रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही…’
-मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिल्यानंतर भाजपचा आणखीन एक सर्व्हे; कोणाचं नावं आघाडीवर?
-पुणे पोलीस सॅम ब्राऊनच्या शोधात; ३ महिन्यात २ हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट
-“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”
-पिंपरी महापालिकेच्या बजेटमध्ये या ३ आमदारांना झुकतं माप; चिंचवडच्या पदरी भरीव निधी