पुणे : पुण्यातील नामांकित रुग्णालयापैकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे नाव घेतले जाते. याच रुग्णालयामध्ये रुग्णांकडून लाखो, कोट्यांनी पैसा वसूल केला जातो. एकीकडे धर्मादाय रुग्णालय म्हणून पाटी लावली जाते, सरकारकडून विशेष मदत घेतली जाते त्याच रुग्णालयामध्ये रुग्णसेवा हा त्यांचा धर्म नसून केवळ पैशाचा हव्यास पहायला मिळाला आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या पीएची पत्नी मोनाली (तनिषा) सुशांत भिसे या महिलेला रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत असताना देखील रुग्णालायात दाखल करुन घेतलं नाही. १० – २० लाख रुपयांची पैशांची मागणी करण्यात आली. हातात एवढी रक्कम नसल्यामुळे अखेर तिचा पती सुशांतने तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले मात्र, २ चिमुकल्या मुलींना जन्म देऊन मोनालीने अखेरचा श्वास घेतला.
मोनालीचा दुर्दैवी अंत झाला. मात्र, सर्वात हृदयद्रावक म्हणजे तनिषा लग्नानंतर ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोनालीच्या या आनंदावर विरझण घातलं आहे. हे ऐकूण सर्वांचेच डोळे पाणावले असतील. सुशांत भिसे आणि मोनाली भिसे यांचा प्रेमविवाह आठ वर्षांपुर्वी झाला होता. दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते. दोघांची ओळख मित्र- मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. या दोघांचा आठ वर्षांपासून प्रेमाचा संसार फुलला होता. मोनाली या पूर्वी शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी काम सोडून दिलं. यादरम्यान, सुशांत यांना प्रशासकीय विभागामध्ये नोकरी लागली. प्रशासकीय विभागामध्ये नोकरी मिळाल्यानंतर अगदी योग्यरितीने त्यांच्या सुखी संसार सुरू होता.
दरम्यान, सुशांत भिसे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रियपणे सहभाग घेतला. परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी सुशांत यांना आरोग्यदूत हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. या सुखी संसांरात तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली. पण केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र मोनाली-सुशांतला लाभलं नाही.
विशेष बाब म्हणजे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत. म्हटल्यावर त्यांनी दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचे काहीही न ऐकता पैसे भरले तरच उपचाराला सुरवाक केली जाईल. असे सांगितले. अखेर सुशांत मोनालीला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेला. तिथे भरती केलं आणि मोनालीने २ गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला, आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तिला आपला जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. तसेच प्रशासनाने या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सध्या मोनालीने जन्म दिलेल्या २ चिमुरड्या मुलींवर व्हेंटिलेटवर उपचार सुरु असून एका बाळाला नुकतंच व्हेंटिलेटवरुन काढलं आहे. दोन्ही बाळांची स्थिती स्थिर आहे. मोनालीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार
-मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी गाडेच्या वकिलाचा जामीनासाठी अर्ज, धक्कादायक दावा