पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. या रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णालयाविरोधात सर्वांकडून आक्रमक पवित्रा घेतला गेला. तनिषा भिसे या महिलेने २ चिमुकल्यांना जन्म दिला आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. या धर्मादाय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचार व्यवस्थित दिले जातात की नाही, हे तपासण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन हा अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३५ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी वापरलाच नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या उत्पन्नाच्या २ टक्के निधी निर्धन आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांच्या उपचारांसाठी राखून ठेवावा’, असा नियम आहे. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्याकडे जमा असलेल्या या निधीतील ३५ कोटी ४८ कोटींचा निधी वापरलाच नसल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसून आले आहे. मार्च २०२५ पर्यंत रुग्णालयाने न वापरलेल्या निधीची ही रक्कम आहे.
रुग्णालय प्रशासनाने धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमांचे पालन केले नाही, असा ठपका चौकशी समितीकडून ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ७० पेक्षा अधिक पानांचा हा अहवाल असून यामध्ये सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या अहवालानंतर शासन कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘जर रस्ता व्हावा ही इच्छाच असती तर….’, सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
-ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’
-‘त्या’ रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
-टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल
-पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे