पुणे : भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आणि पुण्यासभ राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशाअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने अतिरक्त स्त्राव होऊन तनिषाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्या पद्धतीने एका रुग्णाला अधिकचे पैसे भरले नाहीत, म्हणून उपचाराला जो उशीर झाला आणि त्यामुळे मन सुन्न करणारी घटना पुण्यात घडली. या संपूर्ण घटनेची पुण्याचे आरोग्य उपसंचालक आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या माध्यमातून रुग्णालयाचे आणि त्या कुटुंबाचे जे काही म्हणणे आहे ते ऐकून घेतले जाईल आणि त्यानुसार अहवाल समोर येईल. त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्यांतर्गत आहे. यामध्ये शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळत असतो. तरी देखील अशा प्रकारे पैशाची मागणी रुग्णालय करु शकतं का? याची देखील चौकशी होईल. त्यानंतर जे चुकीचं असेल त्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करेल, असेही प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”
-हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोग्य मंत्र्यांचे कारवाईचे आदेश; आता सगळीच चौकशी होणार
-मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा मोठा; मंत्रालयातून फोन तरी ऐकेना, गर्भवतीचा दुर्दैवी अंत