पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळे अनेक कट्टर विरोधक महायुतीमध्ये एकत्र दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असणाऱ्या बारामती आणि शिरूर मतदारसंघातून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
शिरूर लोकसभा लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीकडून इच्छुक असलेल्याची जोरदार चर्चा आहे. आढळराव पाटलांचे कट्टर राजकीय कट्टर विरोधक खेड-आळंदीचे आमदार (अजित पवार गट) दिलीप मोहिते यांची आढळराव पाटील यांनी मोहितेंच्या घरी जाऊन भेट घेतली. आढळराव पाटील यांनी आपापसातील राजकीय वैर संपवण्याचे प्रयत्न केले मात्र मोहिते हे यांची नाराजी कायम असल्याचं दिसून येत आहे.
“शिवाजी आढळराव मला भेटले म्हणजे आमचे मनोमिलन झाले, असे अर्थ काढू नका. शरद पवारांनी जे केलं तेच अजित पवार करू पाहत असतील. तर राजकारण सोडून दिलेलं बरं राहील”, असं म्हणत दिलीप मोहिते यांनी आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध कायम ठेवला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.
“आजवर शरद पवारांनी जे केलं आता तेच अजित पवार करू पाहतायेत का? हे सगळं ठरवून सुरू आहे का? आम्हाला विश्वासात न घेता का केलं जातंय? आम्हाला राजकारणातील काही कळत नाही, असं अजित पवारांना वाटतंय का?” असं म्हणत दिलीप मोहितें यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.
“आढळरावांचा प्रचार करायची वेळ आली तर याऊलट मी शांत बसणं पसंत करेन. कारण आता मला कोणतं पद मिळेल असं वाटत नाही, जे मिळालं ते पुरेसं आहे. त्यामुळं आढळरावांचा प्रचार करायची वेळ आली तर शांत बसणंच पसंत करेन”, अशी भूमिका दिलीप मोहितेंनी स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कार्ट्यांना नीट सांभाळा…आता कोयता गँगचा सुपडाच साफ करणारे”- अजित पवार
-राहुल गांधीविरोधात दाखल दाव्यात कसूर; न्यायालयाने पोलिसांना बजावली कारणे दाखवा नोटीस
-धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन
-दर्ग्याचे ट्रस्ट स्वतः दर्ग्याच्या बाजूचं अतिक्रमण हटवणार; तणाव निवळणार
-पुणेकरांना आता जलद बससेवा मिळणार; पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० नव्या गाड्या