Monsoon Health tips : बदलत्या ऋतुनुसार आपल्या आहारामध्येही बदल करणे अत्यंत महत्वाचे असते. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यामध्ये अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला आवश्यक काळजी घेणे गरजेचे असते. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
पावसाळ्यामध्ये दोन्ही वेळचा आहार लवकर घेतला पाहिजे. जेवणामध्ये रोज एक लिंबू खाल्ले गेले पाहिजे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. पावसाळ्यामध्ये दररोजच्या आहारामध्ये फळभाज्यांचा वापर करावा. तसेच पोळी ऐवजी भाकरी खाणे अधिक फायदेशीर ठरते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्हायरल इन्फेशन होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावासाळ्यात दिवसांत आजारी व्यक्तींनी सफरचंद खाणे शक्यतो टाळावे, नारळपाणी पिऊ नये, काकडी खाऊ नये, तळलेले पदार्थ टाळावेत, आजारातून उठल्यावर त्वरित जड किंवा चमचमीत पदार्थ खाऊ नये. या पदार्थांमुळे पुन्हा आजारी पडण्याची शक्यता असते. पचनास हलके असे अन्न खावे. मऊ भाताची पेज, बीट किंवा गाजर खावेत.
पावसाळ्यामध्ये आहार कसा असावा?
पावसाळ्यात आपल्या आहारामध्ये ताज्या आणि गरम पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. फ्रिजमधील अन्नपदार्थ, पेय, भाज्या खाणे टाळावे.
वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थांचे सूप हे पाचक व जठराग्निवर्धक असते. त्यामुळे त्याचे सेवन करावे. कडू, तुरट आणि तिखट पदार्थ या ऋतूत कमी प्रमाणात खावेत.
आपल्या आहारात पचायला हलक्या आणि ताज्या पदार्थांचा समावेश करायला हवा. यामध्ये तांदूळ, गहू तसेच विविध डाळी भाजून यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत.
पावसाळ्यामध्ये मांसाहार टाळावा, कारण या ऋतुमध्ये पचनशक्ती मंदावलेली असते तसेच मांसदेखील दूषित असण्याची शक्यता असते.
हिरव्या पालेभाज्या या दिवसात दूषित असतात त्यावर अनेक जीवणू, विषाणू असतात, त्यांची वाढही होत असते. त्यामुळे या दिवसांत हिरव्या पालेभाज्या कमी किंवा चांगल्या पद्धतीने स्वच्छ धुवून खाव्यात.
महत्वाच्या बातम्या-
-‘२ दिवस थांबा सगळं सरळ करु’; शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर शरद पवारांचे आश्वासन
-ट्रॅव्हल्समुळे हडपसरमध्ये वाहतूक कोंडी; आमदार तुपे उतरले रस्त्यावर
-‘एकच मुलगी असलेल्या बापाला अनेक गोष्टी…’; शरद पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य
-“तुम्ही नगरसेवक नसतानाही केलेलं काम…” सत्यजीत तांबेंची मोहोळांसाठी ‘खास’ पोस्ट