Vickey Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सध्याचा दमदार आणि अतिशय चर्चेचा आहे. विकी कौशल आता ‘छावा- द ग्रेट वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटसाठी त्याने त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकीने आपला लूक बदलला आहे.
चित्रपटासाठी कोणतीही भूमिका साकारणं विकीसाठी कठीण नाही. प्रत्येक भूमिका विकी कौशल अतिशय चोखपणे करण्यावर त्याचा जोर असतो. विकी कौशल सध्या त्याच्या ‘छावा’मधील भूमिका साकारत आहे. विकीने नुकतेच ‘छावा’ चित्रपटातील संभाजी महराजांच्या वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Getting into the skin of any character..he is a true chameleon 💥🔥#VickyKaushal as Chhatrapati Sambhaji Maharaj 🦁🚩#Chhaava in cinemas on 6th Dec pic.twitter.com/5VL1IOms1e
— VK👑 (@VickySupremacy) April 23, 2024
या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे. छावाच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो लीक झाले आहेत. ‘छावा’च्या सेटवरुन विकी कौशलचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा जबरदस्त लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी; वाकडमध्ये २७ लाखांची रोकड जप्त
-‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील
-आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव; आरटीओमध्ये ‘काळाबाजार’
-राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा