पुणे : काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाही. “भाजप शहर अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार होते, तुझं वागणं नेमकं काय आहे हे त्यांना विचारा. तू एकटा फिरू शकत नाही. कधी तू मरशील हे माहित नाही” असे वक्तव्य शिंदे यांनी केल होत. याचा निषेध करत भाजपकडून काँग्रेस भवन बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता काँग्रेसकडून धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राहुल गांधींच्या भाषणाचा विपर्यास करून काँग्रेस पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्ये धीरज घाटे यांच्याकडून केली जात आहेत. त्यांनी शहरात जागोजागी बेकायदेशिररित्या वादग्रस्त मजकूर असलेले बेकायदेशिर फलक उभे केले आहेत. जातीय दंगली भडकवून त्याचा राजकीय फायदा व्हावा, या हेतूने अन्य धर्मियाच्या भावना दुखावणारी बोचरी वक्तव्ये त्यांनी ओदालना दरम्यान केली असून घाटे हे स्वतःला योगी आदित्यनाथांचे अवतार समजत असून त्यांचे सामाजिक व राजकीय आचरण हे मनोरूग्णासारखे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलिसांकडे केली आहे.
धीरज घाटे भाजपाचे शहराध्यक्ष झाल्यापासून शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यांचा राजकीय इतिहास हा हिंसाचाराचा असून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर दगडफेक करणे, कार्यकर्त्यांना धमकाविणे, अल्पसंख्यांकावर भीतीचे वातावरण निर्माण करणे यामध्ये कायम अग्रेसर असतात. आजवर त्यांच्यावर दाखल गुन्ह्याचा आलेख बघता अनेक समाजद्रोही बाबींसाठी घाटेंवर गुन्हे दाखल झाले असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. धीरज घाटे याच्या विकृत वागण्याने आगामी गणेशोत्सवात व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असं काँग्रेसकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे आता वंचितलाही करणार ‘जय महाराष्ट्र’; पुण्यातील विधानसभेच्या २ मतदारसंघावर केला दावा
-पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अटकेची माहिती लपवली; नेमकं कारण काय?
-महायुतीत इंदापूरच्या जागेवरुन वाद?; हर्षवर्धन पाटील अन् दत्ता भरणेंमध्ये बॅनर वॉर
-पुण्यात झिकाची रुग्णसंख्या वाढतेय; श्रीनाथ भिमालेंचं पालिका आयुक्तांना निवेदन