पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी शुक्रवारी ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन केलं होतं. निखिल वागळे यांचा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आधीच इशारा दिला होता. वागळे हे कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. वागळेंच्या गाडीवर शाई फेकली. त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कायदा आणि सुव्यवस्था कुणीही हातामध्ये घेऊ नये. मग ते कुणीही असो, भाजपचे लोक असो किंवा इतर कुणीही असो, आम्ही त्याच्यावर कारवाई करुच. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्ये करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. तथापि हे कितीही चुकीचं बोलले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं, पोलिसांचं काम आहे. ते पोलीस चोखपणे करतील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत.
‘चार वाजेपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिला होता. कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त लावलेला होता. सहा वाजेपासून कार्यक्रम सुरु देखील झाला होता. निखिल वागळे इथे येणार होते. त्यांच्याशी आम्ही बातचित केली होती. पण इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे येत होते. ट्राफीकमधून येत असताना त्यांच्या गाडीच्या मागेपुढे पोलीस होते. पण येत असताना काही जणांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली आणि पाठीमागून दगड फेकले आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल वागळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या गदारोळानंतर किमान 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“तुझ्या बापाने पाहिला का माझ्याबरोबर काँन्ट्रॅक्टर”; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर अजितदादा भडकले
-निखिल वागळेंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाई; धीरज घाटेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल
-“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे
-शिक्षण संस्थांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार; संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी