मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील १४ व्या विधानसभेचे राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनामध्ये अनेक राजकीय घटना घडला. भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर विधानभवनाच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही लिफ्टनेही एकत्रच प्रवास केला. त्यावेळी लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं, याचा तपशील भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी समोर आणला आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर हेदेखील उद्धव आणि फडणवीस यांच्यासोबत लिफ्टमध्ये होते. लिफ्टमधून बाहेर येताच प्रवीण दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधला.
“राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो होतो. लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, ‘आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं’. त्यावर उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, ‘याला पहिले बाहेर काढा’. तेव्हा मी बोललो की, ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा’. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धव बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं”, असे म्हणत दरेकरांना लिफ्टमध्ये काय बोलणे झाले ते सांगितले.
“आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे
-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!