पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपासाठी वाटाघाटी सुरु आहेत. भाजपने ३२ जागा लढवणार असल्याचं सांगितलं. शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून नवनवे प्रस्ताव पाठवले जात आहेत. मात्र तरीही जागावाटपाचा तेढा आणखी सुटला नाही.
तरीही अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी, ‘आम्हाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात’, हा सूर लावून धरला. शिंदे गटा एवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गटाला) दिल्या तर भाजपने आखलेलं गणित फिसकटू शकतं. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
यावेळी त्यांना अजितदादा गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटापेक्षा कमी जागा घेणार नाही, आम्ही त्यांच्याइतक्याच लोकसभेच्या जागा लढवू’, असे सांगत आहेत. याविषयी फडणवीसांना विचारले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की,
छगन भुजबळ यांनी लावून धरलेल्या मागणीबाबत फडणवीसांना विचारणा केली असता फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, “कोणी काही मागायला हरकत नाही. पण लोकसभा जागावाटपाचा निर्णय हा वास्तविकतेवर आधारित होईल.”
महत्वाच्या बातम्या-
-पुणे मतदारसंघात ओबीसींची संख्या जास्त; राजकीय समीकरणं बदलणार!
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची महत्वाची घोषणा; भाडेतत्त्वाने घर देण्याचा प्रकल्प उभारणार
-‘त्यांच्याबद्दल आजही आदरच, पण…’; शरद पवारांच्या टीकेला सुनील शेळकेंचं उत्तर
-‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली