पुणे : पुण्यातील एफसी रोडवरील हाॅटेलमध्ये २ तरुण अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील बार, पब्स आणि अमली पदार्थांचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधकांकडून प्रशासन आणि सरकारला जाब विचारत आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘त्यांनी काही केलं नाही त्यांचे राज्य होतं तेव्हा त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंडवडे निघाले आणि शंभर-शंभर कोटी रुपयांची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळत आहे, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करत आहे, म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येता आहे. त्यामुळे जे काही ड्रग्ज संदर्भातली परिस्थिती आहे, त्याच्यावर राज्य सरकार परिणामकारक कारवाई करत आहे. अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
Our MahaYuti government has a ‘Zero Tolerance policy’ against drugs.
ड्रग्ज विरोधात महायुती सरकारची ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’.
महायुति सरकार की ड्रग्स के खिलाफ ‘जीरो टॉलरेंस नीति’।(माध्यमांशी संवाद | मुंबई | 25-6-2024)#Maharashtra #DrugCase #Drugs pic.twitter.com/KHSV4a6tET
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 25, 2024
‘जो कोणी यामध्ये सापडेल पोलीसवाला, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल. ही अतिशय कडक कारवाई चालॉली असून कारवाई तशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं, विरोधकांनी याचे राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या अडीच वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं? हे देखील मला सांगावं लागेल. पण माझ्यासाठी हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे. आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेला पाठिंबा विधानसभेला ‘एकला चलो रे!’ पुण्यात मनसेची स्वबळाची चाचपणी; सर्व्हेही सुरू
-शिंदे-फडणवीस सरकारचं शेवटचं अधिवेशन फडणवीसांना पडणार भारी; पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन ठाकरे गट घेरणार
-पुण्यातील फक्त २३ पब अन् बारला परवानगी; त्यातील १ रद्दही झालाय, वाचा नेमका काय प्रकार
-धक्कादायक! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; डॉक्टरला अन् मुलीला झिकाची लागण
-पुण्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली; पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना