पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकार संघाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली नसून सल्ला दिला असल्याचंं फडणवीस म्हणाले आहेत.
बारामती लोकसभेची जागा अजित पवारांकडे जात आहे. त्यानंतर ‘४ जूननंतर क्षेत्रिय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील’, असं शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यावर मोदींनी त्यांना महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती. याबाबत आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोणतीही ऑफर दिली नाही तर त्यांना सल्ला दिला. मोदी म्हणाले की, तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊनही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसोबत यावं. त्यामुळे राजकीय मनसुभे सुटतील”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘१३ तारखेला विरोधकांचा बाजा वाजणार’; बारणेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड-शो
-‘जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात’; नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
-“फ्लॉप ठरलेल्या कलाकाराला पुन्हा संधी द्यायची नाही…” फडणवीसांचा कोल्हेंवर प्रहार
-पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढचे ४ दिवस वीजांच्या कडाकडासह पावसाची शक्यता