पुणे : आज पुण्यात पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले. मात्र व्हिडिओ द्वारे त्यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची चर्चा कार्यक्रमात रंगली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी फाउंडेशन समत्यमेव जयते कप स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्याचे आयोजन केले होते. मात्र विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे फडणवीसांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. मात्र व्हिडिओद्वारे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मी पुन्हा येईन असं वक्तव्य केल्याने कार्यक्रमात चर्चा रंगली.
“मी २०१५ पासून या उपक्रमाशी जोडलो गेलो आहे. जलयुक्त शिवार या मोहिमेतून शेतकऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणी फाउंडेशनचाही त्यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दिल्लीतील तातडीची बैठक यामुळे कार्यक्रमाला इच्छा असूनही उपस्थित रहाता आले नाही. मात्र पुढच्या वर्षी मी नक्की येईन”, असं देवेंद्र फडणीवस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीच्या जागा वाटपाआधी राजकारणात मोठ्या हालचाली; आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
-अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांचा जंगी बर्थडे, म्हणाले “आधी बारामती उरकतो मग पुण्यातच आहे”
-पुण्यात गाडी तोडफोड सुरुच; येरवड्यात कोयता गँग नंतर आता कोंढव्यात दारूच्या नशेत ८ गाड्या फोडल्या
-निलेश राणेंना पुणे पालिकेचा दिसाला; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य
-भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”