पुणे : आगामी विधानसभा निवडणूक दीड दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय नेत्यांची तयारी सुरु आहे. भाजपने पुण्यात कार्यकारिणी अधिवेशनात रविवारी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. या अधिवेशानमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. यावरुन आता संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘विरोधकांना उत्तर देण्यासाठी माझ्या आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा’ असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले आहे. ‘अशी भाषा वापरून कार्यकर्त्यांना आदेश देताना फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत का?’ अशी विचारणा संभाजी बिग्रेडने केली आहे. या वक्तव्याबाबत फडणवीस यांनी माफी मागावी, अशी आक्रमक मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची भाषा गृहमंत्री पदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंत्र्याला राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे? यासाठी दंगली घडवल्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही. असेच फडणवीसांच्या वक्तव्यावरुन कळते, अशी आक्रमक प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका
-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले
-पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती