पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला ते भेट दिली. मात्र त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ‘पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला. या कामगिरीसाठी पुणे पोलिसांचं विशेष अभिनंदन त्यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या रायगडावरील चिन्हाच्या अनावर सोहळ्यावर टीका केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. या चिन्हाच्या अनावरणाचा सोहळा राष्ट्रवादीकडून किल्ले रायगडावर ठेवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी तब्बल ४० वर्षांनंतर शरद पवार रायगड किल्ल्यावर गेले. यावरुन आता भाजपने शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
“मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले. अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी कुठे, कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना उपरोधिक टोला लगावला आहे.
🕒 2.43pm | 24-2-2024 📍 Pune | दु. २.४३ वा. | २४-२-२०२४ 📍 पुणे.
LIVE | Media interaction.#Maharashtra #Pune https://t.co/A5Bwj0pZJE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2024
“पुणे पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. पोलिसांनी अतिशय शिताफीने अमली पदार्थांचा साठा शोधून काढला आहे. सरकारकडून ‘झिरो ड्रग्ज पॉलिसी, नो टोलरन्स फॉर ड्रग्ज’ असे धोरण आखले आहे. केवळ मुद्देमाल पकडून थांबू नका, तर त्याही पुढे जाऊन त्याच्यापाठी असलेल्यांना शोधून काढण्याचे आदेश गृहखात्याने दिले होते. नेमकं ते काम पोलिसांनी केलं. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा मिळाला. पुणे पोलीस आता केंद्राच्या नार्कोटिक्स विभागाबरोबर काम करून आणखी खोलात जाऊन तपास करणार आहेत. अनेक राज्यात अमली पदार्थाविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांच्या यशामुळे देशभरातील कारवायांना बळ मिळणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
-पुणे ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया; एटीएस, एनआयए, सीबीआय, एनसीबीकडून देखील तपास
-घरबसल्या करता येणार मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा, वाचा..
-दिलासादायक! भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणी कपात टळली; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय
-घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज