मुंबई | पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यात लागू करण्यात येणार असून या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये अमरावतीमधील एका सरकारी कर्मचाऱ्याने या योजनेच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये गडबड केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये भाष्य केले आहे.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत सर्व भगिनींना विनंती करतो की, एजंटच्या नादी लागू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून काढून टाकले, सस्पेंड केलं. त्याला बडतर्फ करण्याचा विचारही सरकार करत आहे. सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म ५० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. यावर जर सेतू केंद्राने पैसे घेतले तर त्यांचे सेतू केंद्र रद्द करण्यात येईल. ‘लाडकी बहिण योजना’ पारदर्शकपणे राबण्याचा आमचा हेतू आहे”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
‘राज्य सरकारने अनेक चांगल्या योजनांची घोषणा केली आहे. माझी लाडकी बहिण ही अत्यंत महत्वकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. या योजनेमध्ये काल काही बदल करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये आहे. त्यांना १५०० रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यासाठी सभापतींना दिलगिरीचं पत्र; निर्णय कधी?
-”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा मुस्लिम महिलांना फायदा देऊ नये’; मनसेच्या ‘या’ नेत्याची मागणी