पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जेजुरीमधील ‘मल्हार नाट्यगृहा’च्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले असता भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. शरद पवारांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी (Jejuri Police) ताब्यात घेतले आहे.
सहा कोटी रुपये खर्चून हे नाट्यगृह उभारले असून ही शासकीय इमारत आहे. शासकीय इमारतीचे उद्घाटन हे शासनाच्या वतीने घेतले जावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. ही इमारत अपूर्ण असताना उद्घाटन होत असल्याचा देखील भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर नाट्यगृहाच्या खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या खंडोबाच्या पगडीच्या प्रतिमेवर देखील भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पोलिसांनीआता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नाट्यगृहाच्या खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या खंडोबाच्या पगडीच्या प्रतिमेवर देखील लावण्यात आलेल्या आहेत, हा आम्ही आमच्या देवाचा अपमान समजतो, आणि आम्ही या कार्यक्रमाचा निधेष करत आहोत, असे यावेळी भाजप कार्यकर्ते म्हणाले आहेत. यावेळी जमलेल्या भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संगम आधुनिक विकास अन् संस्कृतीचा; कसब्यात महिलांचा महाभोंडल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
-पक्षप्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना केली ‘ही’ विनंती
-हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होताच जयंत पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा