पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढले होते. त्यातच आता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात सध्या डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात १६ मे रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे.
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने १६ मे रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्यानिमित्ताने केले आहे.
तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रित काळसर संडास होणी ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. अशी काही लक्षणे आढळल्यास नजीकच्या जिल्हा सामान्य रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून मोफत रक्त तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी एलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी एनआयव्ही पुणे व महानगरपालिकेतील सेंटिनल येथे मोफत केली जाते.
नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे. एक दिवस कोरडा पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
डेंग्यू डासांची उत्पत्ती ही साठवलेल्या स्वच्छ पाण्यातही होते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे व्यवस्थापन योग्य रितीने केले तर डासांची निर्मीती तसेच पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण कमी होईल. यासाठी घराजवळ असलेले नाले वाहते करुन, नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत.
नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावेत, पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे, घरातील कुलर, फ्रीजचा डीप पॅन नियमित स्वच्छ करावा, गटारी वाहती करावीत व छोटे खड्डे, डबकी बुजवावीत, अंगभर कपडे घालावेत, झोपताना मच्छरदानीचा व डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.
महत्वाच्या बातम्या-
-बळीराजासाठी आनंदाची बातमी! ३१ मे लाच मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती?
-भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांची प्राणज्योत मालवली
-होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकल मागे