पुणे : कोलकातामध्ये झालेल्या डॉक्टरवरील बलात्कार आणि नंतर खून झाल्याची घटना ताजी असताना आज बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार केल्या प्रकरणी पालकांनी रेल्वे रोको आंदोलन केले. १२ ऑगस्ट २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून या घटनेचा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही तीव्र निषेध करण्यात आले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक माधवराव मानकर यांनी निषेध व्यक्त केला आहे. दीपक मानकर म्हणाले की, ‘पोलिसांच्या तपासात सदर शाळेच्या व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसणे, शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसणे. यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.’
आणखी काय म्हणाले दीपक मानकर?
View this post on Instagram
भविष्यात अशी दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने पुणे शहरातील शाळांची तपासणी करून शाळा व्यवस्थापनास सूचना देण्यात याव्यात की, मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी नेमण्यात यावेत, शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करणे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शहरातील शाळांमध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात यावी, असे आवाहन दीपक मानकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
-तोंडाजवळ आलेला घास बँका घेतायत हिसकावून; लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला
-मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडी, इन्कम टॅक्सची कारवाई; पहाटेपासून कारवाई सुरु
-ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांच्या ‘या’ नेत्याने दिला डच्चू; ‘घड्याळा’ऐवजी हाती घेणार ‘मशाल’