पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हात असून मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांंनी सत्ताधाऱ्यांसह पोलीस प्रशासनावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत.
‘राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्यानेच अनेक बार, पब यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत’ असल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला आहे. ‘५० खोके घेतलेले नेते शांत बसले आहेत’, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अंधारे आणि धंगेकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. दिपक केसकर यांनी सोमवारी विविध प्रश्नांवर प्रसारसाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
दीपक केसरकर काय म्हणाले?
खोके तुमच्या नेत्यांकडे आहेत ते चेक करा. या नेत्यांची चौकशी करा, मग त्याचे वास्तव तुमच्यासमोर येईल. हे जे नाटक तुम्ही सुरू केले आहे ते तुमच्यावरच उलटणार आहे. या घटनेवरून फालतू राजकारण केले जात आहे. सत्ताधाऱ्यांना विनाकारण अडचणीत आणण्याासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे. हिट अॅन्ड रन प्रकरण अपघातामध्ये बळी गेलेल्या दोन अभियंत्यांबाबत सहानुभूती ठेवली पाहिजे. कुठलीही गोष्ट कोणाशी तरी जोडण्याचे उद्योग सध्या सर्वत्र सुरू असून हे उद्योग बंद करा. एक बोट तुम्ही एकाकडे दाखव तेव्हा चार बोट तुमच्याकडे वळलेली आहेत. ज्यांनी आयुष्यात काहीच डेव्हलपमेंटची काम केली नाही ते घेरण्याचा प्रयत्न करतात, असे यावेळी दीपक केसरकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी
-धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?
-Pune Hit & Run | ‘रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर…’; हसन मुश्रीफ यांचा इशारा
-पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?