Health : कोरोना या महामारीने देशाला हैराण करुन सोडलं होतं. भारतात या रोगावर लसीकरण देण्यात आले होते. कोरोना महामारीवरील पहिली लस को-व्हॅक्सिन आणि दुसरी लस कोव्हीशिल्ड लस देण्यात आली. संपूर्ण देशात दोन्ही लसीकरणाचे डोस देण्यात आले. कोरोनावरील लसीमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगितले जाते. आता मात्र कोरोना लसीबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कोरोनाची लस तयार करणारी कंपनी ॲस्ट्राझेनेका हीने युकेच्या न्यायालयामध्ये एक कबुली दिली आहे. या लसीच्या वापराने दुर्लभ प्रकरणात साईड इफेक्ट होत आहे, असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केले आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीने भारतात कोव्हीशील्ड लस तयार करण्यात आली होती. भारतात २ अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यातील १७० कोटी लोकांना कोव्हीशील्ड लस देणयात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात सध्या प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
पण कोव्हीशील्ड लसीकरणाबाबत डॉ. रवी गोडसे काय म्हणतात पहा
कोव्हीशिल्ड चे डोस घेतलेल्यांनो तुमचा मृत्यू अटळ आहे! पण कोव्हीशिल्ड मुळे नाही! कसं फसवलं? pic.twitter.com/Y5kNYwnnq6
— DrRavi (@DrGodseRavi1) April 30, 2024
भारत देशात लसीच्या डोसमुळे काही दुर्मिळ प्रकरणात शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे हृदय विकाराचा झटका येतो. कोव्हीशील्ड लसीने ब्रेनस्ट्रोक, हार्टॲटक आणि पेशींची कमतरता होणे’ असे साईड इफेक्ट होण्याची शक्यता असल्याचा खुलासा कंपनीच्या युकेच्या न्यायालयात केला गेला आहे.
ॲस्ट्राझेनेका या कंपनीच्या मदतीने जिच्या मदतीने भारतात कोव्हीशील्ड लस तयार केली होती. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठी जिवीत झाली होती. ब्रिटनच्या न्यायालयात कोविड मृत्यू प्रकरणाची नुकसान भरापाई प्रकरणात कंपनीने दाखल केलेल्या प्रकरणाने देशातील जनता भीतीच्या छायेत आहे. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अलिकडच्या काळात हार्टॲटॅकने तरुणांचे ऐन उमेदीच्या काळात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या धक्कादायक माहितीने सर्वसामान्य नागगिक घाबरले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘…मग अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी मोदींना का यावं लागलं?’; वाघेरेंचा बारणेंना खोचक सवाल
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’
-पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान
-“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार