पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंडमधील शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्यांने त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीवर आधी बलात्कार आणि नंतर खून करण्याची सुपारी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दौंडमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली. त्याचं हे कृत्य वर्गातील एका विद्यार्थीनी शिक्षकांना सांगितलं म्हणून राग आला. हाच मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क १०० रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे आपल्या शाळेची बदनामी होऊ नये, म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेला. विद्यार्थीनींने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षिका, अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही संपूर्ण घटना त्या विद्यार्थिनीला सांगितली. त्यानंतर या तिने तिच्या घरी घडला प्रकार सांगितला. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, शाळेची बदनामी व्हायला नको म्हणून त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीचे वडिल फिर्यादी हे स्वत:ही शिक्षक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गुरुनं ओलांडली मर्यादा; अल्पवयीन विद्यार्थीनीला केलं प्रपोज, नकार देतात…
-‘सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही….’; सुषमा अंधारे थेटच बोलल्या
-महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…
-लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा