बारामती : संपूर्ण देशाच्या नजरा असलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे आज मतदान पार पडत आहे. बारामती मतदारसंघामध्ये सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत होती. त्यातच इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील मतदान केंद्रावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला दमदाटी, शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरुन बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर आता त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.
आज सुरु असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. “तुम्हाला माझ्याशिवाय कुणी नाही. तो बारामती अॅग्रोचा कुणीही येणार नाही”, असं दत्ता भरणे म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
“मी माझ्या मराठी भाषेत बोललो, पण मी शिवीगाळ अजिबात केलेली नाही. आज मतदान असल्यामुळे मी मतदान केंद्राजवळ फिरत होतो. तिथे कार्यकर्त्यांचं भांडण दिसलं. मी तिथे गेलो, त्यावेळी बारामती अॅग्रोचा कर्मचारी वेगळ्या भाषेत बोलत होता. त्यानं माझ्या विरोधातही शब्द वापरले. मीसुद्धा माणूस आहे, मी त्याला विचारलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, गावकरी त्याच्यावर धावून आले. जर मी तिथे नसतो तर अनर्थ घडला असता. गावकरी त्याच्यावर धाऊन गेले असते. पैशाचे वाटप तो करत होता. माझ्या मराठी भाषेत मी बोललो. कोणताही राजकीय हेतू नव्हता.”
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगात दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे तक्रारीत म्हटलं गेलं आहे. त्यासंदर्भात बोलताना भरणे म्हणाले की, “मी दबाव टाकत आहे, असं वाटत असेल तर व्हिडीओमध्ये जे लोक दिसत आहेत. त्यांचे जबाब नोंदवा. त्यांना विचारा, तिथे पैशाचं वाटप कोण करत होतं, नोकऱ्यांचं आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगातही मी हेच सांगीन. तक्रारीला कायदेशीर पद्धत्तीनं उत्तर देईन.”
महत्वाच्या बातम्या-
-बारामती मतदारसंघातून मतदान करताना ईव्हीएमवर ‘कमळ’ चिन्ह नाही म्हणून आजोबा आक्रमक
-‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
-Baramati | निवडणुकीत पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवार म्हणाले, मी..
-“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील
-बारामतीत मोठा ट्वीस्ट: सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी; चर्चेला उधाण