पुणे : पुण्यातील मुख्य बसस्थानक असलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेने शहरासह संपूर्ण राज्य हादरुन गेले होते. अशातच आरोपी दत्ता गाडे याचे वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण करुन मारहाण झाल्याची तक्रार मंगळवारी देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वेगळीच माहिती समोर आली आहे.
साहिल डोंगरे हे रात्री मद्यधुंद अवस्थेत होते. ते दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाले आहेत. त्यामुळे तक्रारीमध्ये काहीच तथ्य नसल्याचे समोर आले असून हा बनाव रचण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. साहिल डोंगरे हे ज्या बिअर बारमध्ये होते तेथील सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यात येत आहे. रात्री दुचाकी घसरून अपघात झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे”, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, डोंगरे यांनी मंगळवारी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पहाटेच्या सुमारास काही जणांनी हडपसर येथील गाडीतळ परिसरातून त्यांचे अपहरण केले. गाडीत बसवून बेदम मारहाण करून दिवे घाटात सोडून दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी दुर्घटना! पुण्यातील हिंजवडीत टेम्पोला आग; चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत
-दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा-
-सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…
-स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करुन मारहाण, नेमकं कारण काय?
-गावातील समलैंगिक संबंध ठरलं त्याच्या शेवटाचं कारण; गोड बोलून भेटायला बोलवलं अन्…