पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेच्या शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शशिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आढळराव पाटलांना शिवसेनेत घरवापसी करावी म्हणत विनंती केली आहे. आढळराव पाटलांच्या लांडेवाडी येथील जनता दरबारावेळी शिवसेना शिंदे गटाचे हवेली तालुका अध्यक्ष विपुल शितोळे यांनी त्यांना विनंती केली आहे.
आढळराव पाटील यांनी लांडेवाडीमध्ये जनता दरबार भरवला होता. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना पक्षात परत येण्याची विनंती केली आहे. ‘आम्हाला तुमची गरज असून दादा तुम्ही परत या’, अशी कळकळीची विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांचं यावेळचं प्रेम पाहून आढळराव पाटीलही भारावून गेले होते.
दरम्यान, आढळराव पाटलांनी शिरुर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवली. शिरुरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. या हायहोल्टेज निवडणुकीमध्ये खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या निवडणुकीत आढळराव पाटलांना पराभव पत्कारावा लागला. आता लोकसभा निवडणुपुर्वी राष्ट्रवादीत गेलेल्या आढळारावांना कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीमुळे आढळराव पाटीलही भारावून गेले आहेत. यावरुन आता आढळराव स्वगृही परतणार की राष्ट्रवादीसोबतच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: ‘मी आयएएस आहे, माझ्या नादी लागाल तर….’; पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा उच्छाद
-Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज
-पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…
-Pune Rain: काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस; पुढील दोन दिवस शहराला ऑरेंज अलर्ट
-ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर