पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रणधुमाळी पहायला मिळत आहे. पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघापैकी ७ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेसमधील इच्छुकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला ८ पैकी ३ जागा मिळणार असल्या तरीही काँग्रेसने ७ मतदारसंघामध्ये उमेदवारीची मागणी केली आहे.
७ मतदारसंघापैकी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सर्वाधिक इच्छुकांची नावे समोर आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागितले होते. अर्ज करिता खुल्या प्रवर्गासाठी २० हजार तर महिला अशी आरक्षित प्रवर प्रवर्गासाठी १० हजार इतके शुल्क ठेवण्यात आले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील सात मतदारसंघात काँग्रेसचे २९ इच्छुकांनी पक्षाचे पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ८ इच्छुकांची नावे समोर आली आहेत. तर असून खडकवासला मतदारसंघात मात्र उमेदवारीसाठी एकही अर्ज आलेला नसल्याचे पहायला मिळाले आहे.
शिवाजीनगरमधून नगरसेवक दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, मनीष आनंद, महिला शहराध्यक्ष पूजानंद, राज निकम, महेंद्र सावंत, रमेश पवळे, जावेद नीलगर, तर वडगाव शेरी मतदारसंघातून संजय पाटील, रमेश सकट, राजू ठोंबरे, सुनील मलके, तसेच पर्वती मतदारसंघातून माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल, संभाजी जगताप, संतोष पाटोळे आणि हडपसरमधून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि हाजी तांबोळी तर कोथरूड मतदारसंघातून संदीप मोकाटे यांना इच्छुकांच्या अर्जामध्ये समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक
-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’
-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
-तोंडाजवळ आलेला घास बँका घेतायत हिसकावून; लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला