पुणे : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. वित्तमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या योजनेनुसार राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये सरकारकडून मिळणार आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. आता दैनिक सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.
‘मागील अडीच वर्षे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’चा या सरकारला विसर पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक ‘बहिणीं’ची उचकी लागली. त्यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने?, अशा शब्दात ‘सामना’मधून खरपूस समाचार घेतला आहे.
“पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या-नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करीत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडले आहे. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करीत आहेत”, अशी बोचरी टीकाही ‘सामना’मधून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात बनावट पोलिसांकडून नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नागरिकांचा संताप
-लोणावळ्याला जाणं पडलं महागात! भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून
-पालखी सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या; संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस
-रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ
-रोमांचक सामन्यात भारताचा थरारक विजय; धोनी नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जिंकला टी-20 कप