मुंबई | पुणे : आता सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील हेल्थ कॉन्शिअस आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्रा अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे.
‘सरफिरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. केवळ अक्षय कुमारच नाही तर ‘सरफिरा’च्या टीममधील आणखी काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘सरफिरा’च्या प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्राने हिंदुस्तान टाईम्स सिटीला ही माहिती दिली आहे.
अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. प्रमोशनच्या वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. मग त्याला समजले की, प्रमोशन करणाऱ्या टीमचे काही क्रू सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची कोविड चाचणी केली आणि शुक्रवारी सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या जोरदार चर्चा सुरु आहे ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची. याच विवाह सोहळ्यासाठी अक्षय कुमार हजेरी लावणार होता मात्र अक्षयला आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु
-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ
-पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’
-हातात पिस्तूल अन् शेतकऱ्यांवर दादागिरी; पूजा खेडकरांच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल