पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दावा दाखल केला होता. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना २३ फेब्रुवारी अगोदर तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांकडून या तपासणीचा अहवाल ५ मार्च या तारखेपर्यंतही सादर झाला नाही. अखेर न्यायालयाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर राहुल गांधी यांनी भाषण केले होते. यावेळी भाषण करताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यातच सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात मानहानी प्रकरणी फौजदारी दावा दाखल केला.
याबाबत सात्यकी यांनी सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केले होते. संबंधित पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरले होते. या प्रकरणात सत्यता निदर्शनास आल्यानंतर तसेच आरोपी न्यायालयीन कक्षेच्या बाहेर वास्तव्यास असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी संबंधित पोलीस ठाण्याला फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते.
विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करून तपास अहवाल २३ फेब्रुवारीपूर्वी सादर करावेत असे आदेशात म्हटले होते. मात्र, पोलिसांनी तपास अहवाल ५ मार्चपर्यंत सादर न केल्याने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार आहे, असे सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन
-दर्ग्याचे ट्रस्ट स्वतः दर्ग्याच्या बाजूचं अतिक्रमण हटवणार; तणाव निवळणार
-पुणेकरांना आता जलद बससेवा मिळणार; पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० नव्या गाड्या
-पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्याबाबत वसंत मोरेंचं स्पष्ट वक्तव्य
-बेंगळुरु स्फोटाचं पुणे कनेक्शन काय??? रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित पुण्यात असल्याचा संशय